जि प. सदस्य रणजित( भैय्या) शिंदे यांची गणेश गोडसे,अविनाश पवार,आणि बाळासाहेब साळुंखे यांच्या कुटंबीयांची घेतली संत्वन पर भेट.
गुरसाळे प्रतिनिधी:गेल्या आठवड्यात गुरसाळे गावातील इंदापूर येथे अपघातात मयत झालेले गणेश गोडसे, अविनाश पवार व बाळासाहेब साळुंखे यांच्या घरी जाऊन सोलापूर जि.प.सदस्य मा. रणजीत भैय्या शिंदे यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांच्या घरच्या अडचणी जाणून घेतल्या व बाळासाहेब साळुंखे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यांच्या जाण्यामुळे घरावर आर्थीक संकट उभा राहीले. ही बाब युवा मंच चे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी रणजित भैय्या यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेचच मयत बाळासाहेब साळुंके यांच्या मुलाला विठ्ठलराव शिंदे यनिट-2 करकंब येथे पत्र देऊन कामावर घेण्याचे आदेश दिले.
