सोलापुर शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत कामे त्वरीत पुर्ण करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल….सुभाष माने!
राज ठाकरे यांच्या वाढदिनी मनसे कडून आंदोलनाचा इशारा!
सोलापूर : प्रतिनिधी : सोलापुर शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत कामे सुरु आहेत.परंतु या ना त्या कारणांमुळे ती लांबणीवर पडत आहेत.नुकतेच दत्त चौक ते लक्ष्मी मार्केट या मार्गावर स्मार्ट सिटीची कामे करणाऱ्या ट्रक्टरच्या चाकाखाली एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.यापुढे अशा घटना टाळण्यासाठी शहरातील रेंगाळलेली कामे त्वरित पूर्ण करावीत. कामे सुरु असलेल्या ठिकाणी बॅरिकेट,फलक व रात्रीचे वेळी लाईट किंवा कंदील लावावे.पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसामुळे खोदलेले खंड्डे ,ड्रेनेज , खुले चेंबर दिसणार नाहीत.त्यामुळे अपघात होऊन जिवित हानी होण्याची शक्यता आहे.स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अपघात होवून जिवित हानी झाल्यास त्याला अधिकारी व ठेकेदार जबाबदार रहातील.तसेच कामे त्वरित पुर्ण झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोदन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने यांनी आयुक्त ,सिओ मा.ढेंगळे-पाटील साहेबांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
साहेबांनी मनसेच्या निवेदनाची दखल घेऊन,योग्यती खबरदारी घेऊन कामे लवकर पूर्ण करू असे अश्वासन दिले.यावेळी निवेदन देताना,जिल्हा उपाध्यक्ष शहर मध्य सत्तार संय्यद,जिल्हा उपाध्यक्ष शहर दक्षिण निलेश भंडारे,शहर कार्याध्यक्ष अनिल छत्रबंद,तालुका अध्यक्ष वैभव धोत्रे,बाळासाहेब कांबळे,बबलू सावंत व इतर उपस्थित होते.

