आ.सातपुते यांनी शंकर कारखान्यातील बाधीत शेतकरी व कामगारांना न्याय द्यावा तरच तालुक्यात फिरावे – विकास बनसोडे
प्रतिनिधी : माळशिरस : माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांनी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास केला आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांना या आमदाराने कोणत्याही प्रकारची मदत केली नसून या माळशिरस तालुक्यातील जनतेचा भ्रमनिरास केला असल्याची टीका बहुजन ब्रिगेड संघटनेचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष विकास बनसोडे यांनी केली आहे.
माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखाण्याकडे असलेल्या अनेक थकीत ऊस उत्पादक शेतकरी यांची बिले व कामगार यांच्या पगारीच्या प्रश्नावर आवाज उठवून न्याय देण्याची इच्छा व्यक्त केली असताना त्यांच्या प्रश्नाकडे जानून बुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे कारण आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात जावे लागेल ,तसेच जनतेला आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे आमदार अयशस्वी झाले असून स्वतःला ज्या गोष्टी मध्ये काहीतरी मिळते का? याची अपेक्षा ठेवून हे आमदार काम करीत आहेत, त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेला अपेक्षित असा लोकप्रतिनिधी मिळाला नसल्याने आणि स्वतःचे व ठरावीक मागे पुढे फिरणारे व खबरीलाल कार्यकर्त्यांचे हित पाहणारे आमदार राम सातपुते यांना माळशिरस तालुक्यात फिरण्याचा आधीकार नसल्याचे यावेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष विकास बनसोडे यांनी सांगीतले.

