अकलूज नगरपालिका झाल्यास स्थानिक कामगाराना प्राधान्य देण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

अकलूज नगरपालिका झाल्यास स्थानिक कामगाराना प्राधान्य देण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

प्रतिनिधी—अकलूज —बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज ग्रामपंचायत चे नगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यास स्थानिक कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे,अशी मागणी बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी अकलूज ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन देऊन केली आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मोरे,अभिषेक साठे,धनाजी अडगळे,नवनाथ काळे,राहुल कांबळे इत्यादी उपस्थित होते.

आशिया खंडातील एक नंबर असलेल्या अकलूज ग्रामपंचायत चे ब वर्गातील नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा शेवटचा टप्पा असून अकलूज ग्रामपंचायत मध्ये सद्या कार्यरत असलेले स्थानिक कामगार यांना अकलूज ग्रामपंचायत चे नगरपालिका मध्ये रूपांतर झाल्यानंतर प्राधान्य देऊन त्यांना कामावरती रुजू करून घेण्यात यावे,तसेच अकलूज ग्रामपंचायत च्या हद्दीमध्ये राहत नाहीत परंतु ते सद्या अकलूज ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहेत,आशा कामगारांचा विचार हा स्थानिक कामगारांच्या नंतर करावा व स्थानिक कामगारांना प्राधान्य द्यावे,अशी मागणी बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदनाच्या प्रति मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद,विजयसिंह मोहिते पाटील-(माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)यांना पाठविल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom