आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नौटंकी बंद करावी–दत्ता कर्चे
प्रतिनिधी : माळशिरस : विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील उभा केलेल्या विविध गावातील कोविड सेंटरला भेट दिली,मात्र कोणत्याही प्रकारची भरीव मदत उभा केलेल्या कोविड सेंटरला केली नाही,येऊन फक्त पाहणी करण्याची नौटंकी व स्टंटबाजी केली,माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांच्याकडे दोन साखर कारखाने असताना स्वतःच्या कारखान्यात कोविड सेंटर उभा करण्यापेक्षा इतरांनी उभा केलेल्या कोविड सेंटरला भेट देण्याचा बिनकामाचा दौरा केला असल्याचा घणाघात बहुजन ब्रिगेडचे दत्ता कर्चे यांनी केला आहे.
खरोखरच ज्या जनतेच्या जीवावर आपण आजपर्यंत राजकारणाची पोळी भाजून घेतली आणि विविध पदे उपभोगली त्या जनतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देण्याची गरज असताना आपल्याकडे असलेल्या कोणत्याही सहकारी संस्था मध्ये कोविड सेंटर उभा करण्याचे काम मोहिते पाटील यांनी केले नाही आणि देखाव्यासाठी फक्त दौऱ्याचा फार्स करण्याचा स्टंट व नौटंकी करण्याचे काम आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी चालू केले असल्याची टीका बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी केली आहे.
