बहुजन ब्रिगेडचा २८ फेब्रुवारी रोजी अकलूजमध्ये जाहीर मेळावा
प्रतिनिधी—अकलूजमध्ये बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या उपस्थितीत व प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली.
बहुजन ब्रिगेड संघटनेचा २८फेब्रुवारी रोजी तिसरा वर्धापन दिन असून या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावेत आशासूचना पदाधिकारी यांना प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी केल्या आहेत.
सदर बैठकीला संघटनेचे अध्यक्ष किरण साठे,प्रमुख संघटक दत्ता कर्चे,बहुजन ब्रिगेडचे नेते शंकर वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,सदस्य ऋषीपाल बनसोडे,जिल्हा सचिव माऊली धाइंजे,तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे, अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे सिद्धार्थ वाघमारे,आकाश लोंढे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही अकलूज मध्ये कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा व विविध कार्यक्रम आयोजित केले असून हा कार्यक्रम शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा केला जाणार असल्याचे बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी सांगितले.
