सा.बा.वि.पुणे यांच्या कार्यालयासमोर जांबुड ते बोरगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी २५ फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन
कार्यकारी अभियंता,उपअभियंता,शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी–पुणे —
माळशिरस तालुक्यातील जांबुड-बोरगाव-खंडाळी-निमगाव-मळोली रस्ता प्रजिमा क्रमांक १७९ कि.मी ०/०० ते६/०० या कामाची चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या शिवरत्न कन्स्ट्रक्शन या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि या निकृष्ट दर्जाचे व गुणवत्तापूर्ण,प्रमाणकानुसार काम होत नसताना त्यांना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ रोजी ठिय्या आंदोलन केले होते मात्र संबंधित आपल्या विभागचे कार्यकारीअभियंता,उपअभियंता,व ज्यांच्या देखरेखीखाली हे काम होत आहे ते शाखा अभियंता हे सर्वस्वी ठेकेदाराला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने कृती करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन मुख्य अभियंता पुणे यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिले आहे.
या कामामध्ये वापरले जाणारे मटेरियल हे प्रयोगशाळा येथून तपासून काम केले जात असल्याचे पुराव्या अभावी सांगत आहेत,प्रयोग शाळेमध्ये तापसलेले मटेरियल हे या कामामध्ये वापरले जात नसून त्या कामाची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदार हे माळशिरस तालुक्यातील नामांकित घराण्यातील असून त्यांना उघड उघड पाठीशी घालून काम निकृष्ट दर्जाचे होत असताना त्याच्याकडे डोळेझाक करणाऱ्या कार्यकारीअभियंता,उपअभियंता,शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करून संबंधित कामाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी मुख्य अभियंता पुणे यांच्या कार्यालयासमोर येत्या २५ फेब्रुवारी २०२१ रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यात सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे दिला आहे.
