शिंगणापूर ते शिंगणापूर पाटी रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

शिंगणापूर ते शिंगणापूर पाटी रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

प्रतिनिधी—सदाशिवनगर-बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर ते शिंगणापूर पाटी या रस्त्याची कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे बहुजन ब्रिगेड संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी दिले आहे.यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष,धनाजी पाटील,बापू वाघमारे,नातेपुते विभाग प्रमुख अमित बजबळकर,नातेपुते शहराध्यक्ष लखन ओव्हाळ,विकास बनसोडे,आनंद मिसाळ,उदय कांबळे इत्यादी उपस्थित होते.

अकलूजमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली शिंगणापूर ते शिंगणापूर पाटी या रस्त्याचे काम चालू असून संबंधित कामावर आम्ही गेल्यानंतर त्या कामामध्ये निविदेप्रमाणे मटेरियल वापरले जात नसल्याचे व संबंधित कामामध्ये मातीमिश्रित खडी वापरून त्यावर रोलिंग करण्याचे काम सुरू असून निविदेप्रमाणे हे काम होत नाही आणि शासकीय प्रयोग शाळेमध्ये तपासले मटेरियल एवढया मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे कसे असू शकते असा प्रश्न उपस्थित झाला आहे,आणि त्या कामावर आपल्या विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते म्हणजे संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकारी यांच्या संगनमताने हे निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्याची शंका आमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे,असे बहुजन ब्रिगेड संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे सदर काम चालू असताना जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याकारणाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर येत्या 3 फेब्रुवारी 2020 रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom