मनसेमध्ये दलित,ओबीसींना प्रमुख जबाबदारी न देण्याचा सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांचा सल्ला

मनसेमध्ये दलित,ओबीसींना प्रमुख जबाबदारी न देण्याचा सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांचा सल्ला

प्रतिनिधी—सोलापूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र माझा धर्म आहे आणि मराठी माझा जात आहे,आशा प्रकारची घोषणा केली होती.मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील सोलापूर जिल्हातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी मनसे पक्षात दलित व ओबीसी समाजातील लोकांना इथून पुढे तालुका व जिल्हा कार्यकरणीवर प्रमुख म्हणून जबाबदारी न देण्याचा निश्चय केला आहे.त्यांना फक्त इतर पदांची जबाबदारी देण्याचा सल्ला या सोलापूर जिल्ह्यातील मनसेच्या वरिष्ठ पदाधिकारी याने दिल्याने सर्वत्र या गोष्टीची चर्चा पहावयास मिळते आहे.सदर माहिती मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने हा पक्ष चालतोय का?हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे,किंवा या सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या विचाराने हा पक्ष चालतोय हा प्रश्न निर्माण झाला आहे,राज ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात सांगत फिरतात की माझ्या पक्षाच्या कार्यकरणीवर जो काम करेल त्याला संधी दिली जाते,आणि माझ्या पक्षात जात मानली जात नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असलेल्या प्रत्येकाची जात ही फक्त मराठी जात आहे,असे ठणकावून सांगतात मात्र या सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी राज ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली करताना दिसत आहे,दलित व ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना मनसे मध्ये प्रमुख पदावर न घेण्याचा निर्णय हा सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी कसा घेऊ शकतो,आणि मग प्रश्न उपस्थित होतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तर असा आदेश आपल्या वरिष्ठ पदाधिकारी यांना दिला नाही ना? मग हा सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी आपल्या पक्षात या वरील समाजातील कार्यकर्त्यांना संधी देणार नसेल तर मग या पक्षाकडे सर्वसामान्य जनतेने कोणती अपेक्षा ठेवायची मग हा पक्ष कोणत्या जातीसाठी व समाजासाठी या सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात काम करतोय हा ही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom