रेशनिंग कार्डधारकांनी31 जानेवारीपर्यंत आधार लिंक करून घ्यावे – दत्ता कर्चे
फुरसुंगी प्रतिनिधी- महाराष्ट्र सरकारच्या अन्न पुरवठा विभागाने जाहिर केल्यानुसार सर्व अन्नसुरक्षा योजनेमधील संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींचे आधार नंबर देऊन त्यांचे इ के वाय सी चे काम दि .३१/१/२०११ पर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत . तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व गावातील अन्नसुरक्षा योजनेतील सर्व कार्डधारकांनी त्यांचे कुटूंबातील पात्र व्यक्तीचे आधारलिंक करणेसाठी त्यांचे आधारकार्ड , रेशनकार्ड व कुटूंबातील संबंधित व्यक्ती यांना रास्तभाव दुकानदार यांचेकडे घेऊन जाऊन त्यांचे इ पी ओ एस मशीनवर अंगठा देऊन इ पी ओ एस वर नोंदणी करून घ्यावी असे आवाहन बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी आवाहन केले आहे.
सदर सोय रा.भा.धान्य दुकानदार यांचेकडे ३१/१/२०२१ पर्यंत करण्यात आलेली आहे .तरी सर्व कार्डधारकांनी त्यांचे अंगठा देऊन इ के वाय सी नसलेल्या कुटूंबातील व्यक्तीचे धान्य १ फेबुवारी २०२१ पासून बंद केले जाणार आहे .तरी अन्नसुरक्षा योजनेतील सर्व कार्डधारकांनी इ के वाय सी तात्काळ करून घ्यावी.महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थीना आवाहन करण्यात येत आहे की,ज्या ज्या पात्र कुटुंबातील सदस्यांनी आपली नावे रेशन दुकानदार यांचेकडे आधार लिंक करावयाचे राहिले आहेत .
त्या रेशनकार्ड धारकांनी आपल्या कुटूंबातील सर्व व्यक्तींचे आधारकार्ड व रेशनकार्ड यांची छायांकित प्रत आप-आपल्या रास्तभाव धान्य दुकानदार यांचेकडे तत्काळ जमा करून इ के वाय सी द्वारे लिंक करून घ्यावे.अन्यथा फेब्रुवारी २०२१ पासून आपल्या रेशनकार्डवर अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेता येणार नाही.असे बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन केले आहे .
ज्यांचे आधारलिंक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत केले जाणार नाही त्यांचे धान्य १ फेब्रुवारी २०२१ पासून बंद केले जाईल,तरी संबंधित रेशनकार्ड धारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी महाराष्ट्र राज्यातील रेशनकार्ड धारकांना केले आहे.
