माळशिरसच्या गटविकास अधिकारी यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी ९ डिसेंबर रोजी सोलापूर येथे आंदोलन
प्रतिनिधी—माळशिरस—
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ग्रामपंचायतच्या बल व साहित्य खरेदी करण्याच्या प्रकारांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने त्याची चौकशी करून संबंधित ग्रामसेवक, ठेकेदार,सरपंच यांच्यवरती कारवाई करावी व या सर्वांना या प्रकरणामध्ये पाठिशी घालणाऱ्या गटविकास अधिकारी सौ स्मिता पाटील यांना त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी कोळी महासंघाचे सागर कोळी यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री वायचळ साहेब यांना निवेदन दिले आहे.
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ग्रामपंचायतीने एलईडी बल व साहित्य खरेदी करण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने त्याची चौकशी केलेला अहवाल घेवून व तसेच राहिलेल्या चौकश्या त्वरित करून संबंधित ठेकेदार,ग्रामसेवक,सरपंच यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या भ्रष्टाचार प्रकरणातील ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून,संबंधित ग्रामपंचायत सरपंचाचे सरपंच पद त्वरित रद्द करण्यात यावे,तसेच या प्रकरणातील धर्मपुरी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी कोळी महासंघ संघटनेच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले, होते,मात्र त्या आंदोलनाचीही दखल घेतली नसल्याने या सर्व प्रकाराला गटविकास अधिकारी सौ स्मिता पाटील या पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असून या सर्व प्रकरणामधील ग्रामसेवक, सरपंच, ठेकेदार यांच्यवरती त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी व यांना पाठिशी घालणाऱ्या गटविकास अधिकारी सौ स्मिता पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी ९ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर कोळी महासंघाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे .