तब्बल 40 अर्ज अवैध ठरले तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची माहिती
माळशिरस:- सचिन रणदिवे
माळशिरस तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली . त्यामध्ये २० ग्रामपंचायतींमधील ४० अर्ज अवैध ठरले आहेत , अशी माहिती तहसीलदार जगदिश निंबाळकर व नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी दिली .
महाळुग ग्रामपंचायत नगरपंचायत होण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अखेरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही . उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी एक हजार ८ ९ १ उमेदवारांनी एक हजार ८ ९ १ नामनिर्देशनपत्रे दाखल केले होते . छाननीत त्यापैकी ४० उमेदवारांचे ४० अर्ज अवैध ठरले आहेत . एक हजार ८५१ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत .
अर्ज अवैध ठरलेल्या ग्रामपंचायतींमध्ये विजयवाडी , चाकोरे , प्रतापनगर , कुसमोड , माळखांबी , नातेपुते , मिरे , विठ्ठलवाडी , एकशिव , पिंपरी , बचेरी , बांगडे , फडतरी , निटवेवाडी , शिवारवस्ती , बोरगाव , दसूर , भांब , गिरझणी , कोथळे , बाभुळगाव , मांडवे , अकलूज समावेश आहे.
