माळशिरस ग्रामीण रुग्णालयात गरोदर महिलांसाठी प्रसूती करण्याचे सिव्हिल सर्जन यांचे आदेश
किरण साठे यांच्या मागणीला मिळाले यश
प्रतिनिधी—माळशिरस—सिव्हिल सर्जन सोलापूर जिल्हा यांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी गरोदर महिलांसाठी माळशिरस तालुक्यात कोविड सेंटर तात्काळ चालू करावे या मागणीचे निवेदन दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी दिले होते.
माळशिरस तालुक्यातील कोरोना बाधित गरोदर महिलांना नैसर्गिक प्रसूतीसाठी(बाळंतपणासाठी) माळशिरस तालुक्यात कोविड सेंटर उपलब्ध नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होताना दिसत आहे तसेच त्या गरोदर महिलांना प्रसूती साठी खाजगी दवाखान्यात लाखो रुपये खर्च करावा लागत आहे,मात्र ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे त्यांना सोलापूर व इतर ठिकाणी जावे लागत असून त्याच्यासाठी माळशिरस तालुक्यात एक गरोदर महिलांसाठी कोविड सेंटर तात्काळ चालू करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला होता.
त्यामागणीची तात्काळ दखल घेऊन सोलापूर जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ प्रदीप ढेले यांनी माळशिरस तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे,त्यामुळे कोविड १९ बाधित गरोदर माता यांची नैसर्गिक प्रसूती व सिझेंरियन यासाठी स्वतंत्र डेडिकेटेड कोविड आब्सट्रेटिकसेंटर म्हणून माळशिरस ग्रामीण रुग्णालयातील १० खाटा राखीव ठेवण्यात याव्यात तसेच इतर कोविड रुग्णासाठी १० खाटा उपलब्ध करून साईड ऑक्सिजन ची व्यवस्था करण्यात यावी,असा आदेश सिव्हिल सर्जन यांनी वैद्यकीय अधीक्षक माळशिरस ग्रामीण रुग्णालय,यांना दिला आहे,त्यामुळे माझ्या मागणीला यश मिळाले असून माळशिरस तालुक्यातील गोरगरीब कोरोना बाधित गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची आर्थिक लूट थांबणार आहे असे किरण साठे यांनी सांगितले.
माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून व सर्व राजकीय,सामाजिक स्तरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांचे कौतुक केले जात आहे.