पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक बहुजन ब्रिगेड लढवणार – दत्ता कर्चे
नातेपुते प्रतिनिधी–आमदार भारत नाना भालके यांच्या निधनाने पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार असल्याने पंढरपूर विधानसभेच्या 2019 च्या निवडणूकीत कै आमदार भारत नाना भालके यांना बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला होता,मात्र आता होणारी पोट निवडणूक संघटना संपूर्ण ताकतीने लढविणार असल्याचे बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगितले.
बहुजन ब्रिगेड संघटनेचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे जाळे आहे संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर विधानसभा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम बहुजन ब्रिगेड संघटच्या माध्यमातून चालू असते सर्व प्रकारच्या सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या बहुजन ब्रिगेड संघटनेचे कार्य चांगले असल्यानेच संघटना पोट निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवणार आहे यासंदर्भात येत्या 30 डिसेंबर रोजी संघटनेची बैठक पार पडणार असल्याचे संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगितले पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघटनेचे संघटन चांगल्या प्रकारे वाढत असल्याने संघटनेमध्ये अनेक पक्षाचे तसेच अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे बहुजन ब्रिगेड संघटनेमध्ये प्रवेश करण्याचा कल वाढलेला आहे सातारा जिल्हा व पुणे जिल्हा येथील पदाधिकारी निवडी लवकरच करण्यात येणार आहे.
