खाजगी लॅब टेक्निशन यांच्यावर कारवाई करण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी
प्रतिनिधी—पंढरपूर— बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील डेंग्यूच्या चाचणीसाठी अमाप फी घेणाऱ्या लॅब टेक्निशन यांच्यवरती कारवाई करण्याची मागणी बहुजन ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष राजेश खरे यांनी पंढरपूर तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे,पंढरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला या आजाराने ग्रासलेले असताना या आजाराची टेस्ट करताना खाजगी लॅब टेक्निशन अमाप फी वसूल करीत आहेत, तरी त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा बहुजन ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा बहुजन ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे,
या त्वरित मागणीची दखल घेऊन तहसीलदार यांनी पंढरपूर तालुका आरोग्यअधिकारी याना सूचना करून आशा अमाप फी घेणाऱ्या लॅब टेक्निशन यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत, त्यामुळे बहुजन ब्रिगेड संघटनेचे पंढरपूर तालुक्यामध्ये कौतुक केले जात आहे,यावेळीगोविंद लोंढे,गणेश शिरसाट,सिद्धेश्वर वाघमारे, उमेश शिंदे उपस्थित होते.