आरोग्य विभागच्या विरोधात आर पी आय गवई गटाचे २८ अक्टोबरला ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी—माळशिरस–पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सौ कदम नर्स यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आर पी आय गवई गटाच्या वतीने जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे यांनी निवेदन दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ता सावंत,भैय्यासाहेब धाईंजे ता युवक अध्यक्ष माळशिरस दादासाहेब सावंत ता कार्य अध्यक्ष बहुजन ब्रिगेड संघटनेच्या रुक्मिणी रणदिवे,अभिजीत रणदिवे,भाना वाघमोडे उपस्थित होते.
पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सौ कदम नर्स यांच्याविरोधात तक्रार असताना त्यांनी त्यांच्या खुलश्यामध्ये साफ खोटी माहिती दिलेली असून त्यांनी दिलेल्या कागद पत्रावर सरकारी शिक्के नसून काहींवर साह्य नाहीत तरी संबंधित तक्रारदार यांचा खोटा अर्ज तयार करून आपल्याला सादर केला आहे, त्या अर्जामध्ये असलेली सही ही खोटी असून संबंधित लाभधारक यांच्या हाताची निशाणी सुद्धा त्या कागदपत्रांवर नसून त्यांनी आपली जाणीवपूर्वक दिशाभूल केलेली आहे तरी आपण त्यांची त्वरित चौकशी करून चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घालण्याच्या उद्देशाने हा अपूर्ण अहवाल आपल्याकडे सादर केला असून आपण त्यांनि आपल्याकडे सादर केलेल्या अहवालाची कसून चौकशी करावी आणि त्यांना तुमची व तक्रारदार यांची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा अहवाल सोलापूर जिल्हा आरोग्यधिकारी यांना तात्काळ पाठवावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक 28 अक्टोबर पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आर पी आय गवई गटाचे जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे यांनी दिला आहे.
