माळशिरस तालुक्यातील शालेय पोषण आहाराची चौकशी करा–किरण साठे

माळशिरस तालुक्यातील शालेय पोषण आहाराची चौकशी करा–किरण साठे

प्रतिनिधी–पिलीव–गटविकास अधिकारी माळशिरस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदन देऊन माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी मध्ये शालेय पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी मध्ये शालेय पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांची क्वालिटी अतिशय निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये दिले जाणारे अनेक पदार्थ हे अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक हे टाकून देताना दिसत आहेत मात्र त्या निकृष्ट दर्जाच्या पदार्थाकडे आपल्या पंचायत समितीच्या अधिकारी यांचे दुर्लक्ष असून त्यामध्ये दिले जाणारे मीठ आहे,त्यामध्ये मोठे खडे दिसून येत आहेत,तसेच तेलाचा वास येण्याचा प्रकार होत असल्याने तेलही वारपरण्या लायक नसून तसेच इतर डाळी दिल्या जातात त्याचे वजन ही पकेजवर लिहिलेल्या वजनाएवढे दिसून येत नाही तरी या सर्व बाबी मी आपल्या संबंधित अधिकारी यांना दाखविल्या आहेत असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनात म्हटले आहे,

शालेय पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व पदार्थ व डाळीच्या वजनाची चौकशी करून संबंधित ठेकेदार या शालेय पोषण आहाराचे पदार्थ निकृष्ट दर्जाचे देत असून त्याचीही चौकशी करून संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे,सदर निवेदनाच्या प्रति माहितीसाठी व पुढील कार्यवाही साठी मुख्यमंत्रीसो,महाराष्ट्र राज्य,अन्न पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हाधिकारी सो सोलापूर,मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर यांना पाठविल्याचे किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom