कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्या विरोधात बहुजन ब्रिगेडचे ७ सप्टेंबर रोजी आंदोलन

कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्या विरोधात बहुजन ब्रिगेडचे ७ सप्टेंबर रोजी आंदोलन

प्रतिनिधी—फुरसुंगी–कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर सिद्धी रो हाऊस पावरहाऊस या रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व ठेकेदाराला पाठिशी घालणाऱ्या उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत व प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

सदर आंदोलनाची दखल घेऊन दक्षिण विभाग पुणे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी लेखी पत्र देऊन संबंधित कामाची गुणवत्ता स्वतः तपासून व त्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला ते काम पुन्हा करण्यास आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले होते मात्र प्रत्येक्षात कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी त्या कामाची चौकशी केली नसल्याने व संबंधित उपविभागीय अभियंता,शाखा अभियंता, ठेकेदार यांना पाठिशी घालण्याच्या उद्देशाने त्यांनी कामाची पाहणी व चौकशी केली नसल्याने त्यांच्या विरोधात येत्या ७ सप्टेंबर रोजीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे,तसेच सात तारखेच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास व कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई न केल्यास पुढचे आंदोलन हे कार्यकारी अभियंता श्री अजय भोसले यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मुख्य अभियंता श्री साळुंखे साहेब यांच्या कार्यालयासमोर बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच करण्यात येणार असल्याचे बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom