पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्या विरोधात १४ सप्टेंबरला आंदोलन–शंकर वाघमारे

पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्या विरोधात १४ सप्टेंबरला आंदोलन–शंकर वाघमारे

प्रतिनिधी—पुरंदावडे—सौ कदम सिस्टर यांच्यासह ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर वरती कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन माळशिरस तालुक्याचे आरोग्यधिकारी श्री डॉ रामचंद्र मोहिते यांना आर पी आय गवई गटाचे जिल्हाकार्यध्यक्ष शंकर वाघमारे यांनी दिले आहे, यावेळी महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,शेखर सावंत,राहुल भोसले उपस्थित होते.

सदर निवेदनामध्ये पूजा भारत शिंदे यांनी आमच्या संघटनेकडे पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याबद्दल तक्रारी अर्ज देऊन न्याय देण्याची मागणी केली असल्याचे नमूद केले आहे

पुढे निवेदनात म्हटले आहे की पूजा भारत शिंदे यांनी दिनांक २३/११/१९ रोजी आपल्या पुरंदावडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुलं बंद होण्याचे ऑपरेशन केले होते,ते ऑपरेशन सक्सेस झाले नसून त्या ऑपरेशन मुळे संबंधित रुग्णाला तीन महिने सतत त्रास होऊन त्या ऑपरेशनच्या ठिकाणी जखम झाली होती,तसेच तसेच रुग्णाला जानेवारी महिन्यात दिवस गेल्याचे निष्पन्न झाले आणि संबंधित कदम सिस्टर गर्भनिरोधक गोळ्या दिल्या व माझे अबोर्शन करण्यात आले त्यानंतर मला उपचारासाठी नातेपुते,मोरोची याठिकाणी सुद्धा नेण्यात आले होते व खाजगी दवाखान्यात जाण्यापासून भीती घालून रोखले तरी मला या ऑपरेशन सक्सेस न झाल्याने माझा मोठ्या प्रमाणावर खर्चही झाला असून संबंधित ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर वरती व संबंधित सिस्टर वरती त्वरित कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर १४ सप्टेंबर रोजी पासून शासकीय वेळेमध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा आर पी आय गवई गटाचे जिल्हाकार्यध्यक्ष शंकर वाघमारे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom