यशवंतनगर येथील कमर क्लिनिची चौकशी करण्याचे उपविभागीय अधिकारी अकलूज यांचे आदेश
प्रतिनिधी–माळशिरस—उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर सुमित्रा नगर (यशवंतनगर )येथील कमर क्लिनिक (दवाखाना )यांची चौकशी करून रुग्णांना सेवा नाकारल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने व दवाखाना सतत बंद ठेवल्याने त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी व मार्च ते ऑगस्ट महिन्यात किती रुग्णांना सेवा दिली याची चौकशी करावी तसेच दवाखाना मार्च ते ऑगस्ट महिन्यात किती वेळा उघडला आहे यासाठी त्यांच्या दवाखान्याचे सी सी टी व्ही फुटेज तपासावे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी आर पी आय गवई गटाचे जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे,कोळी महासंघाचे अध्यक्ष सागर कोळी,बहुजन ब्रिगेडचे तालुका सरचिटणीस अभयराजे भोसले,आर पी आय गवई गटाच्या महिला आघाडी च्या रुक्मिणी रणदिवे,शेखर सावंत,धवल कांबळे,निलेश साठे,आशुतोष साठे,राहुल भोसले इत्यादी उपस्थित होते.
सदर आंदोलनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज सौ शमा पावर यांनी यशवंतनगर येथील सुमित्रा नगर येथील कमर क्लिनिकची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन संबंधित अहवाल या कार्यालयाला पाठवा असा आदेश दिला आहे, तसेच अशा आशयाचे लेखी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांना दिले आहे.
चौकट
यशवंतनगर येथील सुमित्रा नगर येथील कमर क्लिनिक यांच्यावर शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून दवाखाना बंद ठेवल्याने व रुग्णांना सेवा न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी मी ठिय्या आंदोलन करताच उपविभागीय अधिकारी अकलूज यांनी संबंधित विषयाची चौकशी करून संबंधित क्लिनिक वर कार्यवाही करावी असे माळशिरस तालुका आरोग्यधिकारी याना आदेश दिल्याचे लेखी पत्र मला दिले आहे,त्यामुळे माझ्या आंदोलनाला यश मिळाले आहे,जोपर्यंत या क्लिनिक वर कारवाई होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.
किरण साठे–सरचिटणीस सोलापूर जिल्हा-राष्ट्रवादी काँग्रेस
