अखेर बहुजन ब्रिगेडच्या आंदोलनाला मिळाले यश—दत्ता कर्चे

अखेर बहुजन ब्रिगेडच्या आंदोलनाला मिळाले यश—दत्ता कर्चे

प्रतिनिधी—फुरसुंगी–कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर सिद्धी रो हाऊस पावरहाऊस या रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व ठेकेदाराला पाठिशी घालणाऱ्या उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत व प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सदर आंदोलनाची दखल घेऊन दक्षिण विभाग पुणे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी लेखी पत्र देऊन संबंधित कामाची गुणवत्ता स्वतः तपासून व त्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला ते काम पुन्हा करण्यास आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले असल्याने बहुजन ब्रिगेड संघटनेच्या आंदोलनाला यश आले असल्याचे बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेश प्रमुख संघटक यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंता श्री भोसले यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार दिनांक ६ सप्टेंबर पर्यंत संबंधित रस्त्याची चौकशी करून ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई न केल्यास ७ सप्टेंबर पासून पुन्हा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी दिला आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ आगलावे,पुणे जिल्हा संघटक अविराज माने,सिद्धी रोहाऊस संपर्क प्रमुख अक्षय मांढरे,शंकर पाटील,कृष्णा कर्चे,आशुतोष साठे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom