यशवंतनगर येथील दवाखाण्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
प्रतिनिधी–सोलापूर—उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदन देऊन सुमित्रा नगर (यशवंतनगर )येथील कमर क्लिनिक (दवाखाना )यांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने लॉक डाउनच्या काळामध्ये रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या व दवाखाने बंद ठेवणाऱ्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे असे आदेश असताना मार्च ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत व अजूनही दवाखाना बंद ठेवण्याचे काम सुमित्रा नगर (यशवंत नगर)येथील कमर क्लिनिक यांनी केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर क्लिनिक हे डॉ आर एम शेख हे चालवित असून त्यांनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले आहे,क्लिनिक बंद ठेवणे म्हणजे त्यांनी रुग्णांना उपचार देण्यापासून वंचीत ठेवल्याचे सिध्द होत आहे,तरीही त्यांनी मार्च ते ऑगस्ट महिन्यात किती दिवस दवाखान्यात सेवा दिली हे पाहण्यासाठी त्यांच्या दवाखान्यात असलेल्या सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि या संबंधित डॉ आर एम शेख यांच्या क्लिनिकची मान्यता रद्द करण्यात यावी असा प्रस्ताव आपल्या विभागामार्फत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठवावा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार डॉ आर एम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथाउपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर २ सप्टेंबर रोजी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.
