बांधकाम विभाच्या विरोधात बहुजन ब्रिगेडचे २७ ऑगस्टरोजी ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी—फुरसुंगी–सिद्धी रोहाऊस पावर हाऊस फुरसुंगी या रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग पुणे यांना निवेदन दिले आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ आगलावे,आकाश हरपळे, स्वयंभू फाऊंडेशन सिध्दी रोहाऊस संपर्क प्रमुख अक्षय मांढरे, गणेश कदम होते.
सिद्धी रो हाऊस पावरहाऊस फुरसुंगी येथील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे,सदर सिमेंट रस्त्यावरती संपूर्ण तडे गेलेले आहेत व रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे आम्ही वेळोवेळी मोरे राव साहेब व ठेकेदार यांना सांगून हे सदर ठेकेदाराने केलेले सिद्धी रो हाऊस येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे असे वारंवार सांगितले होते,मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आहे,असे निवेदनात म्हटले आहे आणि हे काम निविदेप्रमाणे झालेले दिसून येत नाही तसेच या कामामध्ये वापरलेले मटेरियल हे निकृष्ठ दर्जाचे असल्याने हा रस्ता खचला असून रस्त्याला तडे गेले आहेत म्हणजे हे काम संबंधित ठेकेदाराने निविदेप्रमाने केले नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तरी सदर कामाची चौकशी करून ठेकेदार व ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्यांवर निलंबनाची व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे हि कारवाई न केल्यास कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर दिनांक २७ ऑगस्ट रोजी तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी बांधकाम विभागला दिला आहे.
