प्रतिनिधी—माळशिरस तालुक्यामध्ये भाजपच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी यांच्या दुधाला अनुदान व वाढीव भाव देण्याच्या मागणीसाठी माळशिरस येथे आंदोलन करण्यात आले,त्या आंदोलनामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व विधानसभेचे आमदार राम सातपुते हे दोघेही सहभागी झालेले दिसून आले,मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना हे आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी व्यक्त केली आहे.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे सदाशिवनगर येथील साखर कारखण्याचे विद्यमान चेअरमन असून त्यांनी त्या कारखान्याला ऊस घातलेल्या ऊस उत्पादक शेतकरी यांची अजून देणी दिली नाहीत आणि शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवून आंदोलनामध्ये सहभागी होणे ही नौटंकी असल्याचीही किरण साठे यांनी म्हटले आहे.
माळशिरस तालुक्याचे विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान व वाढीव भाव मिळायला पाहिजे यासाठी आंदोलन केले त्याच पद्धतीने या माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने व शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिले आहे याचे भान ठेवून सदाशिवनगर येथील साखर कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला व त्यांची एफ आर पी ची रक्कम मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्या शेकऱ्यांना न्याय देण्याची हिम्मत दाखवली पाहिजे असेही प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
ऊस उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्नावर माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते हे आवाज उठवत नाहीत व दुध उत्पादक शेतकरी यांच्या प्रश्नावर आवाज उठवतात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी आपले मत व्यक्त केले आहे,तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊसाची बिले व एफ आर पी ची रक्कम विधान परिषदेचे आमदार व सदाशिवनगर येथील कारखाण्याचे विद्यमान चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देणी दिली नसल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी आपल्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकार म्हटले आहे.