पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नोंदनीसाठी अहवान.
*मतदार नोंदणीची दुसरी फेरी. 23/11 ते 09/12/2019 पर्यंत चालू राहणार आहे,ही पोस्ट अत्यंत काळजीपूर्वक वाचा व इतरांना शेअर करा. अशी माहिती ग्रामीण भागातील तरुणांना कोणीच देत नाही..
*पुणे पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू झालेली असून, या आधीची मतदार यादी संपूर्ण रद्द झाली आहे. सर्वांनी मतदार नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी खालील महत्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात….*
◆ *नवीन नोंदणी 23 नोव्हेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2019 दरम्यान होत आहे.*
◆ *या अगोदर पदवीधर मतदार असलेल्यांनी ही नव्याने पुन्हा नोंदणी करावयाचीच आहे.*
👇🏻 नाव नोंदणी अटी:-
◆ *1 नोव्हेंबर 2016 पूर्वी कोणत्याही विद्यापीठातुन पदवीधारक अथवा पदवी समकक्ष अर्हता प्राप्त पाहिजे* म्हणजे निकाल 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी लागलेला हवा.
◆ *पदवीधारक कोणाला म्हणायचे-* बी.ए, बी. कॉम, बी.एस्सी, बी ई (सिव्हिल,मेकॅनिकल,आय टी,कॉम्प्युटर), बी.ए.एम.एस, बी.डी.एस, बी.सी.एस, बी.बी.ए, बी.सी.ए, 12 नंतर 3 वर्षाचा कोणताही डिप्लोमा, बी.फार्म, बी.लीब, एल.एल.बी. इ.पदवीधारक मतदान करू शकतात.
◆ पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये पुणे, सातारा, सांगली ,कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील असणाऱ्या पदवीधर मतदारांचा समावेश होतो
👇🏻 नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया:-
◆ *सोबत पदवीधर नाव नोंदणी फॉर्म-18 ची लिंक पाठवत आहोत. फॉर्म डाउनलोड करण्यासाठी http://election2019.setuonline.com/FormNo18.pdf या लिंक वर उपलब्ध आहे.*
त्याची प्रिंट काढावी. किंवा आपल्या तहसिल कार्यालय अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडून फॉर्म नंबर-18 घेऊन त्यामध्ये पासपोर्ट फोटो चिटकवून, स्वतःचे पूर्ण नाव, वडिलांचे पूर्ण नाव, स्वतःचे शिक्षण, जन्म तारीख, व्यवसाय, पत्ता, विधानसभा मतदार संघ, मतदान असलेल्या गावाचा भाग क्रमांक (मतदार केंद्र क्रमांक), मतदार ओळखपत्र (ईपीक) क्रमांक, फोन नंबर, पदवी विद्यापीठ नाव, पदवी प्राप्त वर्ष आदी माहिती भरून मागणीदाराची स्वाक्षरी करावी.
◆ *पूर्ण भरलेला फॉर्म आपल्या गावाच्या मंडळ अधिकारी किंवा तहसिल कार्यालय येथे स्वतः जमा करावा* (काही तहसिल अंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी ही नेमलेले आहेत, यासंदर्भात माहिती तहसिल कार्यालयात मिळेल.)
◆ *फॉर्म सोबत*
*स्वतःचा एक पासपोर्ट फोटो*
*शिक्षणाचा पुरावा-* आपल्या पदवीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
*रहिवासी पुरावा-*
मतदार ओळखपत्र/आधार कार्ड/रहिवासी दाखला/लाईटबील
*जन्मतारखेचा पुरावा-* आधार कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला/ड्रायव्हिंग लायसन्स/जन्म दाखला
या *साक्षांकित (attested) प्रतीच जोडव्यात*
◆ *विवाहित महिलांचे लग्नापूर्वी वडिलांच्या नावाने शिक्षण झालेले असते आणि लग्नानंतर कागदोपत्री पतीच्या नावाने नोंदी असतात. म्हणून महिलांनी मॅरेज सर्टिफिकेट(विवाह नोंदणी दाखला) किंवा पॅनकार्ड साक्षांकित प्रत जोडावी*
◆ *पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.* त्यामुळे अर्ज हा आपल्या तहसिल कार्यालयात किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी यांच्याकडे जाऊनच भरावा लागणार आहे.
*_विशेष आवाहन_*
१ नोव्हेंबर २००५ पुर्वी वा नंतर लागलेले सर्व पेंशनविहीन कर्मचारी, आपण जुनी पेंशन चा संघर्ष हा सर्व *लोकशाही आयुधांचा* वापर करून करत असताना पदवीधर मतदारसंघात आपल्या नावाचा *मतदार* म्हणून समावेश असणे हे अत्यंत महत्वाचे आहे…
*त्यामुळे तुमच्यासह तुमच्या परिवारात, शाळेत वा कार्यालयात जे जे पदवीधर आहेत त्या सर्वांची मतदार नोंदणी करण्याची ही संधी दवडू नका.*
*_अजुनही भरपूर अवधी असून या काळात वेळात वेळ काढून जवळच्या तहसील कार्यालयात जावून आपल्या नावाची नोंदणी करावी….._*
*सर्व मित्रांना विनंती आहे की, वरील पोस्ट आपल्याकडील सर्व ग्रुप वर व वैयक्तिक नंबरला तात्काळ पाठवून सहकार्य करावे.*
अधिक माहितीसाठी किंवा काही अडचण असल्यास संपर्क करा.
फाॅर्म उपलब्ध आहेत
*मा.संतोष भाऊ हरपळे मित्र मंडळ*
*पावरहाऊस फुरसुंगी*
संपर्क कार्यालय:- लक्ष्मी कमल पॅलेस
☎-: 08551989999
#आधार #बहुउद्येशीय #संस्था #महाराष्ट्र #राज्य