स्वयंभू फाऊंडेशन व आधार संस्थेच्या वतीने किरण साठे यांचा कोरोना योध्या म्हणून सन्मान
प्रतिनिधी—फुरसुंगी—महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची सुरवात झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनीमाळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला व ज्या लोकांना खरोखर गजर आहे अशा १७५३ कुटुंबातील व्यक्तीना अन्य,धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे, व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वसामान्य जनतेला व गोरगरिबांना धीर देण्याचा प्रयत्न केला व या काळामध्ये रेशनदुकान दार यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मालापासून वंचीत रहावे लागत आहे हे पाहून त्यांनी रेशनदुकानदार यांच्या विरोधात मोहीम उघडून सर्वसामान्य जनतेला व रेशनकार्ड धारकांना शासनाच्या नियमानुसार माल वाटप करण्यास भाग पाडले.
हजारो सर्वसामान्य व गोरगरिबांना न्याय दिला असून त्याची दखल घेऊन पुणे येथील स्वयंभू फाऊंडेशन व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.तसे सन्मान पत्र आधार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दत्ता कर्चे व स्वयंभू फाऊंडेशन यांच्या संस्थापक अध्यक्ष संतोष हरपळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांना सन्मान पत्र दिले आहे. किरण साठे यांचा सन्मान सन्मान झाल्याने खोरखरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम केलेल्या व्यक्तीचा सन्मान या संस्थेने व फाउंडेशनने केल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.
