
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवभोजन थाळीची शाखा व कारागृह चालू करण्याची पालकमंत्री यांच्याकडे किरण साठे यांची मागणी
प्रतिनिधी—अकलूज
माळशिरस तालुक्यातील कारागृह व अकलूजमध्ये शिवभोजन थाळीची शाखा चालू करण्याची मागणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी लेखी निवेदन देऊन अकलूज येथील विश्रामगृह येथे केली आहे. पालकमंत्री माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,पंचायत समिती सदस्य अजय सकट,युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे,के.पी काळे,आनंद मिसाळ,बंडू कांबळे इत्यादी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील अकलूज हे गाव मेडिकल हब,विविध प्रकारच्या बाजारपेठा तसेच पर्यटन स्थळ व अनेक गोष्टीमध्ये नामांकित असून या शहरामध्ये माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावातील व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या कारणाने अकलूजमध्ये येत असते.त्यामध्ये सर्वसामान्य व गोरगरिबांना हॉटेल मध्ये जेवण व नाष्टा करणे परवडत नाही व माळशिरस तालुक्यातील अकलूज,वेळापूर,माळशिरस, नातेपुते येथील पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड संपल्यानंतर त्या आरोपींना मजेस्टिक कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्यांना माळशिरस मध्ये ठेवण्यासाठी कारागृह उपलब्ध नसल्याने त्या आरोपींना सोलापूर झेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा या झेल ला पाठवावे लागत आहे,त्याचा नाहक त्रास या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना सहन करावा लागत असल्याने कारागृह चालू करण्याची व शिवभोजन थाळीची शाखा चालू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.