अकलूजमधील भाजी मंडई प्रत्येक विभागात चालू करावी–किरण साठे
प्रतिनिधी—अकलूज
अकलूजमधील भाजी मंडई ही अकलूजच्या प्रत्येक विभागात चालू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन देेेऊन केली आहे.यावेळी आनंद मिसाळ,बंडू कांबळे इत्यादी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यामध्ये तीन रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे,सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत,त्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माळशिरस तालुक्यातील
अकलूजमधील भाजी मंडई ही नवीन एसटी स्टँड च्या पाठीमागे एकत्र भरविण्यात येत असून या भाजी मंडई मुळे,अकलूजमधील पंचवटी,काझी गल्ली,भराबाई गट,अकलाई नगर,राऊत नगर,महादेव नगर,जुना सराटी रोड,या परिसरातील जनतेला या नवीन उभारण्यात आलेल्या भाजी मंडई मुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,ही भाजी मंडईचे अंतर खूप मोठया प्रमाणात लांब असून तेथे जाणे सर्वसामान्य जनतेला परवडत नसून तेथे जाणे शक्य नसून त्या मंडईमध्ये बसणारे शेतकरी, व माळवे विकणारे व्यावसायिक यांचा धंदाही मंदावला असून त्यांनाही अनेक समस्येला सामोरे जावे लागत असून त्यांच्या मालाचेही नुकसान होताना दिसून येत आहे असे निवेदनात म्हटले आहे.
सदर मंडई ही एकत्र भरविण्यात आल्यामुळे अचानकपणे मंडई मध्ये गर्दी उद्भवल्यास व त्या गर्दीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा वावर झाल्यास त्याला कोण जबाबदार राहणार आहे, त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता आपण लॉक डाउनच्या सुरवातीच्या काळात ज्याप्रमाणे प्रत्येक विभागात मंडई विकण्यासाठी नियोजन केले होते त्याप्रमाणे नियोजन करण्याचा निर्णय त्वरित न घेतल्यास व रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या मंडई धारकावर त्वरित कारवाई न केल्यास दिनांक १७/७/२०२० रोजी उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.
