राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाला मिळाले यश
प्रतिनिधी—अकलूज—माळशिरस तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने या तालुक्यामध्ये रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत होते,त्याचअनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांना दिनांक ४नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्याच्या मागणीसाठी येत्या १०नोव्हेंबर रोजी आदोलनाचा इशारा देण्यात आला होता,या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री ढेपे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांना माळशिरस तालुक्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर असून पाऊस थांबल्यानंतर सर्व खड्डे बुजवले जातील असे लेखी पत्र दिले आहे.
माळशिरस तालुक्यातील खड्डे बुजवण्याचे काम प्रत्यक्ष चालू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला यश आल्याचे जिल्हा सरचिटणीस यांनी सांगितले.यावेळीराष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे, पिंटू एकतपुरे,सोमनाथ शेळके,राहुल अडगळे,दत्ता सावंत,सचिन भवर,सागर कोळी,सुरज मोहिते, हनुमंत वायदंडे