
प्रतिनिधी—
वेळापूरमधील भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबा जाधव यांनी महावितरण वेळापूर येथील अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनामध्ये वेळापूर परिसरातील सर्व वाडी वस्त्यांवरील (आडत वस्ती,म्हेत्रे मळा व बनकर वस्ती)येथे आपल्या विभागामार्फत चालू केलेल्या भारनियमनामुळे येथील शेतकरी त्रस्त झालेले आहेत, लाईट येण्याचे व जाण्याची वेळ चुकीची असल्याने शेतकऱ्यांना लागवडीसाठी वेळेवर व मुबलक प्रमाणात वीज न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झालेली आहे. असे असताना आपण रात्री अपरात्रीची लाईट येण्याची वेळ देऊन शेतकऱ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे त्यास कोण जबाबदार असेल? त्यामुळे येथील थ्री फेज लाईट च्या वेळेमध्ये त्वरित बदल करावा व थ्री फेजचे कनेक्शन बंद झाल्यानंतर त्वरित सिंगल फेज लाईट चालू करावी,तसेच आपण या निवेदनाची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरले जाईल व आपल्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरणसाठे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाधव,सागर कोळी बहुजन नेते काकासाहेब जाधव ,शिवसेना वेळापूर शहर अध्यक्ष अप्पा कांबळे ,युवक नेते हनंमत वायदंडे माजीद मुलाणी राहूल सराटे, शेतकरी भागवत गायकवाड, डाॅ धनंजय म्हेत्रे, बापूसाहेब आडत मोहन वाघे ,अब्दुल शेख, संजय पनासे,अक्षय सराटे ,धनाजी वाघ ,भैय्या चंदनशिव ,चोरमले सर, गणेश पिसे व शेतकरी बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.