नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना बेरर चेकच्या स्वरूपात रोख मदत करा—राष्ट्रवादी काँग्रेस

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना बेरर चेकच्या स्वरूपात रोख मदत करा—राष्ट्रवादी काँग्रेस

प्रतिनिधी—अकलूज— राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारी अकलूज यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे व युवक जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे यांनी त्याच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून माळशिरस तालुक्यातील उर्वरित राहिलेले पंचनामे त्वरित करावे,माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे,त्या शेतकऱ्यांना एकरी ३५हजार रुपये मदत करण्यात यावी,ती मदत गाव कामगार तलाठी यांच्या मार्फत बेरर चेकच्या स्वरूपात रोख देण्यात यावी.

तसेच माळशिरस तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या त्याब्यात असलेल्या रस्त्यांची दुर्दशा व दुरावस्था झालेली आहे,त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी,तसेच या तीन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना द्याव्यात व त्यांनी रस्ते दुरुस्ती न केल्यास रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अपघात होऊन प्रवाशाला काही बरे वाईट झाल्यास अधिकारी यांच्यावर मनुष्य वादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे,
,सदर मागण्याचा उपविभागीय अधिकारी,राष्ट्रीय महामार्ग,सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी सकारात्मक विचार न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या १०नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या कार्यालसमोर तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उदय देशमुख,पिंटू एकतपुरे,हनुमंत वायदंडे,सूरज मोहिते,सुदाम आवारे,सोमनाथ शेळके,राहुल अडगळे,शब्बीर शेख,किशोर घोलप,दत्ता सावंत,सागर कोळी,राहुल सराटे,महेश नाईकनवरे,रफिक मुलाणी इत्यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom