अतुल खूपसे या इसमाने अवैधरित्या जमीन बळकावल्याप्रकरणी माहिती सेवा संस्थांच्या वतीने 1 जुलै रोजी आमरण उपोषण

अतुल खूपसे या इसमाने अवैधरित्या जमीन बळकावल्याप्रकरणी माहिती सेवा संस्थांच्या वतीने 1 जुलै रोजी आमरण उपोषण

प्रतिनिधी सचिन रणदिवे

अतुल खूपसे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी खूपसे यांने अर्जदार डांगे यांच्या कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन दि.2008 रोजी माढा सत्र समित समोर भाडेतत्वावर करार करून पंधरा एकर जमिनीचे करार करून घेतले होते करारामध्ये दरवर्षी 6000/- प्रमाणे रक्कम डांगे परिवाराला अतुल खुपसे यांनी देण्याचे ठरवले होते परंतु अतुल खुपसे यांनी 2008 ते 2020 पर्यंत काही रक्कम अर्जदार यांच्या कुटुंबाला दिलेली नाही व सदर कराराच्या रकमेवर विषयी बोलले असता असे या गुन्हेगारने गावगुंडांना हाताशी धरून डांगे कुटुंबीयांना बऱ्याचदा मारहाण केली परंतु पोलिसांनी डांगे कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले सदरचा प्रकार पाहता सदरचे गाव, तालुका जिल्हा भारतात मधले आहेत का याविषयी शंका वाटू लागले आहे कायदा हा संपूर्णपणे आर्थिक पाठबळ याच्या आधारावर चाललेला आहे असे प्रथमदर्शनी दिसते म्हणून आरोपी खूपसे यांच्यावर कारवाई करून लँड माफिया कायदेशीर प्रक्रियेचा विचार करून गुन्हा दाखल करावा व पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन माहिती सेवा भावी संस्था संस्थापक अध्यक्ष व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप (भाऊ) लगड मेजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी मा.जि.प.सदस्य बाळासाहेब सपताळे, माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र संघटक महेंद्र भाऊ साठे, माहिती सेवाभावी संस्था सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन रणदिवे यांनी माढ्याचे नायब तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच 1 जुलै रोजी आमरण उपोषणासाठी माजी सैनिक आघाडी महाराष्ट्र राज्य, भीमथडी माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य, जय जवान माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातील 227 आजी-माजी संघटनेचा या उपोषणास पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्व आजी माजी सैनिक धावले शेतकऱ्यांच्या मदतीला सर्व संघटनेने एकच नारा दिला की जय जवान जय किसान तसेच महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या जमिनीवर अतिक्रमण किंवा कुणी जमिनी बळकावल्या असल्यास त्यांना मोफत न्याय देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल असे माजी सैनिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा श्री नारायण अंकुशे मेजर साहेब, व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा श्री संदीप (भाऊ)लगड मेजर साहेब यांनी केले आहे व सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांना व सोलापूर जिल्ह्यातील सर्व सामान्य शेतकरी बांधवांना ही जाहीर आवाहन करण्यात येते की रस्ता,शेतावर अतिक्रमण आणि अनेक प्रकारच्या काही अडचणी असल्यास वार बुधवार दिनांक 01/ 07/ 2020 रोजी सकाळी साडेदहा वाजता माढा तहसील कार्यालय येथे उपस्थित रहावे असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom