किरण साठे यांचा शिवबुद्ध युवा प्रतिष्ठाण कडून कोविड योद्धा म्हणून सन्मान
प्रतिनिधी–सचिन रणदिवे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अकलूज,माळेवाडी,संग्रामनगर माळीनगर परिसरातील ज्यांना रेशनकार्ड नाही खरोखरच ज्यांना गरज आहे अशा १७५३ कुटुंबाना धान्य वाटप केले आहे,तसेच एक हजाराहून जास्त गरजू लोकांना घरपोच जेवण,पाचशे मास्क वाटप,सॅनिटायझर वाटप करण्याचेही काम राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी केले असल्याने शिवबुद्ध युवा प्रतिष्ठानकडून संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी कोविड योद्धा गौरव सन्मान पत्र दिले आहे.
माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अनेक विषयांवर आवाज उठवून त्याना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न केला आहे.सोलापूर जिल्ह्यासह व प्रामुख्याने माळशिरस तालुक्यातील रेशनदुकानदार यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मिळणारा हक्काचा माल मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभा केले आहे व शासनाच्या नियमाचे धडे रेशनकार्ड धारकांना दिल्याने त्यांच्या हक्काचा माल त्याना उपलब्ध झाल्याने व हजारो किलो तांदूळ,गहू सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला असल्यानें राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांचा शिवबुद्ध युवा प्रतिष्ठान च्या वतीने कोविड योद्धा म्हणुन सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
