काळजी घ्यावी लागणार : सोलापूरात आज सकाळी वाढले 7 नवे रुग्ण ; बाधितांची संख्या 590 वर
प्रतिनिधी:-सोलापूर
सोलापूरात आज सकाळी नव्याने 7 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सकाळी नव्याने आलेल्या 7 रुग्णांमध्ये 4 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या 7 रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 590 झाली असून एक जणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली.आज एकूण 102 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 7 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 95 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.5 हजार 55 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 52 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 254 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.सोलापूर शहर व जिल्ह्यातील 5 हजार 645 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.