भांबुर्डी ग्रा.स विष्णुपंत वाघमोडे यांच्या निवेदनाची उपअभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती माळशिरस यांनी घेतली दखल

भांबुर्डी ग्रा.स विष्णुपंत वाघमोडे यांच्या निवेदनाची उपअभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती माळशिरस यांनी घेतली दखल

प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

मौजे भांबुर्डी ग्रामपंचायत हद्दीतील 14 व्या वित्त आयोगातील शेंडगे वस्ती ते साळुंखे वस्ती खंडागळे वस्ती ते मोटेवस्ती म्हसवड रोड ते दडस वस्ती रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे खडी टाकून वरती शाडू मातीचा थर टाकून काम पूर्ण केले आहे रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत खडी उघडी दिसत आहे या रस्त्याचे काम शासनाच्या नियमाप्रमाणे होत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे निकृष्ट दर्जाचे काम निदर्शनास आणून देखील जाणून-बुजून चौकशीसाठी टाळाटाळ केली जाते तरी आपण वरिष्ठ स्तरावर कामाचा दर्जा तपासून कॉन्ट्रॅक्टर, शासकीय अधिकारी,ग्रामसेवक, शाखा अभियंता, व संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी संबंधित कामाची चौकशी होईपर्यंत बिल थांबवण्यात यावेत अशा आशयाचे पत्र भांबुर्डी ग्रामपंचायत सदस्य विष्णू आण्णा वाघमोडे यांनी दिनांक 15/05/2020 रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, उपविभागीय आयुक्त महसूल शाखा विभाग पुणे, राष्ट्रीय अपराध जाॅच बिरो मुख्य कार्यालय(उ.प्र) यांना ई-मेल द्वारे पाठवले होते. त्याचप्रमाणे दिनांक

21/05/2020 रोजी पंचायत समिती माळशिरस बांधकाम विभागाचे उपअभियंता एस एस कुपल साहेब यांनी स्वतः तिन्ही रस्त्याची पाहणी केली व प्रत्येक रस्त्यावरती किती प्रमाणात मुरूम किती प्रमाणात खडी वापरण्यात आले आहे याची खात्री करून घेतली व संबंधित तक्रार ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत वाघमोडे यांना त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने ऑफिशियली पत्राद्वारे उत्तर देण्यात येईल असे पंचायत समिती माळशिरस बांधकाम विभागाचे उप अभियंता एस एस कुपल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom