सोलापुरात अडकलेले ३६९३ मजूर रेल्वेने लखनौला रवाना

सोलापुरात अडकलेले ३६९३ मजूर रेल्वेने लखनौला रवाना

प्रतिनिधी:-सोलापूर

टाळेबंदीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय विस्थापित मजुरांना त्यांचा मुलखात पाठविण्याचे काम सुरूच असून बुधवारी सोलापूर व पंढरपूर येथून दोन स्वतंत्र विशेष रेल्वेने ३६९३ मजुरांना लखनौकडे रवाना करण्यात आले.
सोलापूर रेल्वे स्थानकावरून दुपारी लखनौसाठी विशेष श्रमिक रेल्वे पाठविण्यात आली. या माध्यमातून १४३२ विस्थापित मजुरांना पाठविण्यात आले. तर पंढरपूर येथून सायंकाळी दुसऱ्या श्रमिक रेल्वेने १३६१ मजुरांना लखनौकडे पाठविण्यात आले. यापूर्वी कुर्डूवाडी येथून १४ मे रोजी लखनौकडे जाण्यासाठी १२४६ उत्तर प्रदेशीय मजुरांना पाठविण्यात आले होते. आतापर्यंत लखनौकडे तीन स्वतंत्र रेल्वेगाडय़ांद्वारे ३९२९ मजुरांना पाठविण्यात आले आहे.
याशिवाय यापूर्वी पंढरपूरहून तामिळनाडूकडे ९ मे रोजी ९८१ मजुरांना रवाना करण्यात आले होते. त्यानंतर १७ मे रोजी सोलापूरहून ग्वाल्हेरला ११४६ मजुरांना पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण ६३५६ परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुलखात रेल्वेने पाठविण्यात आले आहे.
उद्या गुरुवारी पंढरपूर येथून रांची येथे १३२३ मजुरांना तर शुक्रवारी पंढरपुरातूनच पाटणा येथे १३७६ मजुरांना रवाना केले जाणार आहे. याशिवाय राजस्थानात जोधपूरला पंढरपूर येथून १४३४ मजुरांना घेऊन विशेष रेल्वे रवाना होणार आहे. तसेच येत्या शनिवारी सोलापूरहून पश्चिम बंगालमध्ये हावडा येथे विशेष रेल्वेने १४८६ मजुरांना पाठविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom