पत्रकार गणेश कांबळे यांना मारहाण करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पत्रकार गणेश कांबळे यांना मारहाण करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

प्रतिनिधी इंदापूर

पोलीसांचा खबरी असल्याच्या संशयावरून तसेच सातत्याने दारू संबंधित बातम्याप्रसिद्ध करत असल्याचा रोष मनात धरून बावडा ( ता. इंदापूर ) येथील पत्रकार गणेश कांबळे यांच्यावर धारदार शस्त्र हातात घेवून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला. यासंदर्भात त्यांनी बावडा पोलीस दुरक्षेत्र मध्ये खबर दिल्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात बावडा येथील सहाजणांविरुद्धइंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. इंदापूर पोलिसांनी कोरोना संचारबंदीत बावडा व परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यावर पोलीस कारवाई केली होती. त्याच्या बातम्या पत्रकार गणेश कांबळे यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्या रोषातून गणेश हा पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून तसेच अवैध दारूच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचा रोष मनात ठेवून गणेश यास लक्ष्य करण्यात आले. त्यास सोशल मीडियावरून मारण्याची धमकी देण्यात आली. दि. 5 मे रोजी रात्री8:30 वाजता गणेश हा नरसिंहपूर चौकात शुभम लोंढे व राजरत्न कांबळे यांच्यासमवेत उभे असताना तेथे प्रथमेश उर्फ गोठ्या संतोष गरड, आर्यन उर्फ बबल्या समीनदर, विजय उर्फ दादा शरद भोसले तीन साथीदारांसह त धारदार शस्त्र घेऊन आले. मोठा पत्रकार झाला आहे, दारूच्या बातम्या पोलिसांना देतो का असे म्हणत शस्त्राचा धाक दाखवून गणेश यास शिवीगाळ, दमदाटी करण्यात येऊन त्यास लाथाबुक्यांनी त्याच्या मान,पाठ ,पाय व पोटात जबर मारहाण करण्यात आली. गणेशचे मित्र भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले असता आता वाचला पण परत सापडला तर जिवंत सोडणार नाही अशी त्यास धमकी देण्यात आली. उपरोक्तआरोपीं विरुद्ध सात कायदा कलमाखालीइंदापूरपोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom