
महसूल विभागाने खरेदी विक्री व्यवहार चालू केल्याने बहुजन ब्रिगेडच्या मागणीला यश- दत्ता कर्चे
नातेपुते प्रतिनिधी -:महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यामध्ये महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जमीनींचे खरेदी विक्री व्यवहार चालू करून व बांधकाम क्षेत्रातील खरेदी विक्री चेही व्यवहार चालू करण्याची मागणी दिनांक २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली होती.सदर मागणी संदर्भात बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केल्याने खरेदी विक्री सुरू करण्याचे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
जमीनी व बांधकाम या क्षेत्रातील व्यवहारामुळे गोळा होणारा महसूल हा करोडो रुपयांच्या पटीत असून महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना महामारीच्या संकटात महसूल उभा करण्याच्या दृष्टीने जमिनींचे व बांधकाम क्षेत्रातील खरेदी विक्री चे व्यवहार चालू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होणार आहे.त्या महसूलातून कोरोनाच्या संकटावर मात करण्यास मोठा आर्थिक हातभार लागणार असल्याचे बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी निवेदनात म्हटले होते.
सदर खरेदी विक्री करतेवेळी या मध्ये शासनाने सोशलडिस्टंशिग पाळून महसूल गोळा करण्याच्या दृष्टीने हे खरेदी विक्री चे व्यवहार चालू करावेत अशी मागणी श्री कर्चे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती,त्याची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यातील खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी सोलापूर चे जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करण्याच्या अटी वरती परवानगी दिली असल्याने बहुजन ब्रिगेडच्या मागणीला यश आल्याचे महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दत्ता खर्चे यांनी सांगितले.