
रोहित रणदिवे खून प्रकरणातील आरोपीवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची आर पी आय गवई गटाची मागणी
प्रतिनिधी–माळशिरस—रोहित रणदिवे खून प्रकरणातील आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मागणी आर पी आय गवई गटाचे सोलापूर जिल्हा कार्यध्यक्ष शंकर उर्फ बापू वाघमारे यांनी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गोल्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनामध्ये नमूद केले आहे की,माळशिरस शहरामध्ये रोहित रणदिवे यांचा १ मे २०२० रोजी संध्याकाळी अमानुष असा खून करण्यात आला आहे,त्यामध्ये असेलेले आरोपी यांची फार मोठ्या प्रमाणावर माळशिरस शहरामध्ये दहशत असून या गुन्ह्यातील अमोल उत्तम पावर या गुन्हेगारांचा सख्खा भाऊ प्रमोद उत्तम पवार हाही कुख्यात गुंड असून त्याचीही माळशिरस शहरामध्ये मोठी दहशत आहे,त्यामुळे या गुन्ह्यातील सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावा व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी शंकर उर्फ बापू वाघमारे यांनी केली आहे.सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सोलापूर,पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण,उपविभागीय अधिकारी अकलूज यांना पाठविण्यात आल्या आहेत.यावेळी किरण साठे,दत्ता कर्चे,विकास बनसोडे,नाना ओव्हाळ,सचिन शिंदे,अभिजित रणदिवे,इत्यादी उपस्थित होते.