
माळशिरस खून प्रकरणातील रणदिवे कुटुंबाला बहुजन ब्रिगेड कडून ११ हजार रुपयांची मदत
प्रतिनिधी—माळशिरस तालुक्यातील माळशिरस शहरातील रोहित दत्तू रणदिवे या युवकाचा १ मे २०२० रोजी संध्याकाळी निर्घृण खून करण्यात आला होता,त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी स्वतः मयत रोहित रणदिवे यांच्या आईकडे ११ हजार रुपयांचा धनादेश दिला,यावेळी बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे माळशिरस चे माजी सरपंच विकास धाइंजे,NDMJ चे सचिव वैभव गिते,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,डॉ कुमार लोंढे,आर पी आय गवई गटाचे जिल्हा कार्यध्यक्ष शंकर वाघमारे,वैभव धाइंजे,धवल कांबळे,विकास बनसोडे,अभिजित रणदिवे,नाना ओव्हाळ उपस्थित होते.