
जेष्ठ व शारीरिक अनफीट पोलिस कर्मचारी यांना रजा व कार्यालयीन कामकाज द्यावे -अॅड विराज कर्चे
फुरसुंगी प्रतिनिधी-
जगभरात कोरोना या जीवघेण्या विषाणूने थैमान घातलेले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब व माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रात जाहीर केलेले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, स्वयंसेवी संस्था अहोरात्र मेहनत घेत आहेत. सदर अत्यावश्यक सेवेतील कोव्हीड योद्धा ऑनड्युटी असताना त्यांना कोरोनाची लागण होत आहे, ही बाब चिंताजनक आहे. विशेषतः पोलीस अधिकारी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत असल्याने त्यांना कोरोना संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्रात पोलिस बांधव ड्युटीवर असताना त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. पोलीसांना कोरोनाची लागण झाल्यावर त्याच्या कुटूंबियांना देखील कौरंटाईन व आरोग्य तपासणीस सामोरे जावे लागत असल्याने अकारण पोलीसांचा कुटुंबीयांना जिवातास व आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. कोरोनामुळे काही पोलिसांना मृत्यूला देखील सामोरे जावे लागलेले आहे. सबब, ५५ वर्षांपुढील व व्याधी, विकार असलेल्या पोलिसांना सक्तीच्या
ऑनसाईट, बंदोबस्त, फिल्ड ड्युटी मधून वगळणे गरजेचे आहे. अनेक पोलिस बांधव त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तसा अर्ज देखील करीत आहेत. परंतु, त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. नुकतेच पुण्यामध्ये फरासखाना पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी कोरोना आजारामुळे दुर्देवी निधन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ५५ वर्षांपुढील व व्याधी, विकार असलेल्या पोलिसांना सक्तीच्या ऑनसाईट, बंदोबस्त, फिल्ड ड्युटीमधून वगळून कार्यालयीन कामकाज सोपवणे पोलिस व त्यांच्या कुटूंबियांच्या तसेच आपणा सर्वांच्या दृष्टीने हिताचे आहे.
तरी आपले स्तरावरून ५५ वर्षांपुढील व व्याधी, विकार असलेल्या पोलिसांना सक्तीच्या ऑनसाईट, बंदोबस्त, फिल्ड ड्युटीमधून वगळून कार्यालयीन कामकाज सोपविण्याचे तसेच, शारिरीक दृष्टीने अनफीट पोलीसांना विशेष बाब म्हणून रजा देण्याचे आदेश तातडीने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावेत आसी या वेळी अॅड विराज कर्चे यांनी मुख्यमंत्र्यांना मागणी केली आहे.