
ग्रामपंचायत कार्यालय नातेपुते यांना दलित महासंघ व मांतग समाज यांच्या वतीने निवेदन
प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
ग्रामपंचायत दलित वस्ती सुधार योजनेच्या 15% निधीतून व इतर ग्रामपंचायत निधीतून कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रार्दभावामुळे व लॉकडाऊन मुळे आमच्या समाज्यातील गवंडी कामगार व मजुरी करित असल्या बांधवावर येवून उपासमारीची वेळ येऊन ढेपलेली आहे तरी ग्रामपंचायत निधीतून व 15℅ दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीतून प्रत्येक कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात यावे व ज्यांना पिवळे व केसरी कार्ड,आधार कार्ड किंवा रेशन कार्ड लिंक न नसलेल्या व ते नातेपुते येथील रहिवाशी असून अशा कुटुंबाना त्यांचे आधार कार्ड पाहून जीवनाशक्य वस्तूंचे वाटप करण्यात यावे असे बोलताना दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे यांनी सांगितले.
सदर मागणी ही दलित महासंघ व मातंग समाज्याच्या वतीने निवेदना द्वारे करण्यात आली आहे.यावेळी दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा बापू लांडगे,अनिल गिताराम लांडगे,रुपेश मोहन लांडगे
माणिक सुखदेव लांडगे उपस्थित होते.