दिव्यांग व्यक्तीचा हक्काचा ५% निधी त्याच्या खात्यावर जमा करावा–लक्षवेधी सेना

दिव्यांग व्यक्तीचा हक्काचा ५% निधी त्याच्या खात्यावर जमा करावा–लक्षवेधी सेना

प्रतिनिधी–सचिन रणदिवे

देशामध्ये कोविड19 या या विषाणूचा फैलावामुळे देशामध्ये लॉकडाउन असून दिव्यागावरती उपासमारीची वेळ आली असून शासनाच्या नियमानुसार सन 2018-19 सन 2019-20 या काळवाढीमधील दिव्यांगासाठीचा 5% निधी दिव्यांगाच्या खात्यावर जमा करण्यात यावा अशी मागणी लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्याकडे केली आहे.यावेळी लक्षवेधी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे उपस्थित होते.

पंचायत समिती माळशिरस तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने तात्काळ दिव्यांगाच्या खात्यावर निधी जमा करावा तसेच शक्य असल्यास चालू वर्षामधील सन 2020-21या वर्षाचा सुद्धा 5% निधी दिव्यांग यांना देण्यात यावा तसेच दिव्यांग शेतकरी व इतर दिव्यांग यांना मालमत्ता कारामध्येही कुटुंब प्रमुखाची अट न लावता शासन निर्णयानुसार सवलत देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षांमध्ये शेतीपूरक व्यवसायासाठी फळबागासाठी तात्काळ अर्थ साहाय्य करावे तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने तात्काळ दिव्यागांच्या खात्यावर निधी जमा न केल्यास त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक संबंधित ग्रामपंचायत यांच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom