सख्ख्या भावांची भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाची झाली हत्या

सख्ख्या भावांची भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाची झाली हत्या

प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खंडाळी येथे सख्ख्या भावांची भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाची झाली हत्या.

फिर्यादी विठ्ठल नामदेव खंडागळे वय वर्ष ६६ राहणार खंडाळी ता. माळशिरस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रेय अंबादास यमगर, राजेंद्र अंबादास यमगर, रुक्मिणी अंबादास यमगर यांच्याविरोधात वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ (अनुसूचित जाती जमाती) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दत्तात्रय यमगर, राजेंद्र यमगर, रुक्मिणी यमगर या तिघांनाही वेळापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

वेळापूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय व राजेंद्र हे दोघे सख्खे भाऊ आहेत या दोघांची किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. हे भांडण मिटवण्यासाठी शेजारील विठ्ठल नामदेव खंडागळे गेले होते. उलट त्यांनाच शिवीगाळ केली. शिवीगाळ का केली म्हणून विचारण्यासाठी गेले असता रामचंद्र विठ्ठल खंडागळे वय वर्षे ३९ यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते मयत झाले. हा प्रकार दि. १ मे २०२० रात्री ०९:१५ वाजता घडला आहे. सदर घटनेचा तपास उपाधीक्षक पोलीस अधिकारी अकलूज राजगुरू साहेब करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom