महापालिका आयुक्त व महापौर आहेत कुठे– कुणाल कांबळे

महापालिका आयुक्त व महापौर आहेत कुठे– कुणाल कांबळे

सध्या कोरोना‌ व्हायरस सोलापूर शहरात जो धुमाकूळ घालतोय याला सर्वस्वी सोलापूर महानगरपालिका व त्यांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे.सोलापूरचे महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे हे नियोजनशून्य अधिकारी आहेत सर्व नियोजन जिल्हाधिकारी साहेबांवर सोपवून चालणार नाही. कोरोना‌ सोबतचा लढा हे एकटे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जोर लावून लढत आहेत, त्याला‌ ना महानगरपालिका आयुक्तांची साथ मिळत आहे ना महपौरांची ना नगरसेवकांची , मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष कुणाल कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना ई-मेल द्वारा मागणी केली होती की शहरातील सर्व नागरिकांची तसेच आरोग्य कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांची सरसकट आरोग्य तपासणी व्हावी, ही मागणी मान्य झाली पण सोलापूर शहरातील पॉवर फूल नगरसेवकांचे मोजके प्रभाग वगळता बाकी शहरात फक्त कागदोपत्री सर्व्हे करण्यात आला.
हा सर्व्हे करण्यासाठी ना प्रशिक्षीत कर्मचारी होते ना त्यांच्याकडे कोणतेही साधन नव्हते..
सिव्हील हॉस्पिटल मध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांची हेळसांड होत आहे हे काही माध्यमांनी उघडकीस देखील आणले आहे तसेच कोरोना च्या पेशंट ची ने आण करण्याकरिता नेमलेल्या अॅबुलन्स चालकांना पीपीई कीट उपलब्ध नाहीत..
तरी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सोलापूर चे महापालिका आयुक्त यांची बदली करून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकाऱ्याची बदली करून सोलापूर मधून कोरोना व्हायरस ला हद्दपार करण्यासाठी योग्य ती कठोर पावले उचलण्याची मागणी करणारे पत्र पाठवणार आहे..!!

कुणाल नागनाथ कांबळे
विभाग अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom