महसूल विभागाने खरेदी विक्री व्यवहार चालू करावे – दत्ता कर्चे

महसूल विभागाने खरेदी विक्री व्यवहार चालू करावे – दत्ता कर्चे

नातेपुते प्रतिनिधी -:महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यामध्ये महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जमीनींचे खरेदी विक्री व्यवहार चालू करून व बांधकाम क्षेत्रातील खरेदी विक्री चेही व्यवहार चालू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

जमीनी व बांधकाम या क्षेत्रातील व्यवहारामुळे गोळा होणारा महसूल हा करोडो रुपयांच्या पटीत असून महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना महामारीच्या संकटात महसूल उभा करण्याच्या दृष्टीने जमिनींचे व बांधकाम क्षेत्रातील खरेदी विक्री चे व्यवहार चालू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होणार आहे.त्या महसूलातून कोरोनाच्या संकटावर मात करण्यास मोठा आर्थिक हातभार लागणार असल्याचे बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगितले.

पुणे,मुंबई या सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बिल्डींग कन्स्ट्रक्शन आहेत,व्यवहार करतेवेळी या मध्ये शासनाने सोशलडिस्टंशिग पाळून महसूल गोळा करण्याच्या दृष्टीने हे खरेदी विक्री चे व्यवहार चालू करावेत अशी मागणी श्री कर्चे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom