
जय मल्हार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नातेपुते यांनी जपली सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी— सचिन रणदिवे
करोना या विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले असून सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे याच पार्श्वभूमीवर
माळशिरस तालुक्यातील नातेपुते ते जय मल्हार बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यावतीने गोरगरीब गरजू लोकांना पालेभाज्यांचे 700 किट वाटप करण्यात आले. त्यामध्ये कोबी, टोमॅटो,गवार,शेवगा कांदा,कोथिंबीर,बटाटा,भेंडी,कारले, दोडका,आणि भोपळा अशा अकरा पालेभाज्यांचा समावेश होता या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य
श्री माऊली पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बाबाराजे देशमुख, श्री रघुनाथ (आण्णा) कवितके, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्री मामासाहेब पांढरे, संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष काळे,उपाध्यक्ष श्री बाळासाहेब पांढरे, सचिव श्री विजय अर्जुन,नौशाद आत्तार, श्री धनंजय जालिंदर माने,श्री बाळासाहेब ठोंबरे,श्री तात्या काळे, श्री दत्तात्रय ठेंगल, श्री अंकुश कचरे, श्री केशव पांढरे,
श्री संजय गांधी,श्री महादेव बरडकर आदी प्रतिष्ठित मान्यवर व संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते हा कार्यक्रम शासकीय नियमांचे पालन करुन साजरा करण्यात आला तसेच सोशल डिस्टिंक्शनचेही पालन करण्यात आले.