
अजून पाच गरजू कुटुंबास मा.श्री डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री प्रतिष्ठान तर्फे शिधावाटप
करोना या विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले असून सर्व व्यवहार अगदी बंद पडले आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले आहे देशात आलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मदत व छोटासा हातभार म्हणून मा.डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री प्रतिष्ठान अकलूज तर्फे गरीब व गरजू कुटुंबांना दाळ पाच किलो,साखर, तांदूळ, दाळ,आदि वस्तूं चे वाटप करण्यात आले. यावेळी मैत्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांनी माहिती दिली आणि डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मैत्री प्रतिष्ठान अकलूज हे लॉक डाऊन यांच्या काळात गरजू लोकांचा आसरा बनत आहे हे दिसून येत आहे.यावेळी प्रवीण निकम,सोहम बोडके,अभी बिटे,गणेश काळे,सोनू इंगोले मैत्री प्रतिष्ठान चे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.