किरण साठे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपली समाजाची बांधीलकी

किरण साठे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपली समाजाची बांधीलकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी अकलूज व आसपासच्या परिसरातील निराधारांना,गरजू,गोरगरीब, ज्यांना रेशनकार्ड नाहीत अशा व खरोखरच ज्यांना अन्न धान्य याची गरज असणाऱ्या लोकांना घरपोच जेवण,धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असल्याची भावना सर्वसामान्य जनतेमध्ये पहावयास मिळते आहे.

कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना फक्त सामाजिक बांधिलकी व राजकारणाबरोबर समाजसेवा करण्याची आवड असल्याने त्यांनी सर्वसामान्य माणसाला मदत केली आहे.

या मदत केलेल्या माणसांकडून किरण साठे यांना आशीर्वाद देण्यात येत आहेत,किरण साठे सारख्या सर्वसामान्य व्यक्तीने आज जवळजवळ साडे आठशे लोकांना मदत केली आहे,काही पक्षाचे,संघटनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत असलेल्या लोकांना मदत करताना दिसत नाहीत अशा सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या कामाचा लेखाजोखा डोळ्यासमोर ठेऊन अडचणीत सापडलेल्या व खरोखरच ज्या लोकांना गरज आहे अशा सर्व लोकांना मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपावी अशी भावना सर्वसामान्य जनतेतून ऐकवयास मिळत आहे.

काही संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी नाही त्या वेळेस आपण किती मोठ्या प्रमाणावर समाजसेवा करतोय असे भासवत होते मात्र ज्यावेळी खरीच जनतेला मदतीची आवश्यकता आहे त्यावेळेस मात्र समाजसेवेचे सोंग करणारे घरात गप्प बसल्याने त्यांची समाजसेवा होती की आणखी काही स्टंट होता हे सर्वसामान्य लोकांना समजले आहे,त्यामुळे अशी स्टंटबाजी करणाऱ्या लोकांनाही आवाहन आहे की जनतेला खरोखरच आता तुमच्या मदतीची गरज आहे त्यामुळे आपण गरजू लोकांना मदत करण्यासाठी घराच्या बाहेर पडले पाहिजे.आणि इतर जी सर्व पक्षाचे,संघटनेचे पदाधिकारी काम करतायत त्याप्रमाणे आपणही सक्रिय होऊन या कामामध्ये हातभार लावून जनतेची सेवा करण्याचे आवाहन नवा चाणक्य न्युज पोर्टल कडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle