अकलूजमधील ८९ कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेड यांच्याकडून घरपोच जेवण

अकलूजमधील ८९ कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेड यांच्याकडून घरपोच जेवण

प्रतिनिधी—सचिन रणदिवे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू,गोरगरीब, निराधार,ज्यांना रेशन कार्ड नाही व खरोखरच ज्या लोकांना आवश्यकता आहे अशाच गरजवंतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सुरू केलेल्या घरपोच जेवण या योजनेच्या पहिल्याच दिवशी अकलूजमधील नागोबा कट्टा,नवीन बाजारतळ,महर्षी कॉलोनी येथील ८९ कुटुंबाना एक दिवस पुरेल एवढे जेवण(चपाती,भात,कऱ्याची मटकी )त्यांच्या संघटनेच्या पदाधिकारी शहराध्यक्ष उदय कांबळे,साहिल अडगळे व कार्यकर्ते यांच्या मार्फत घरपोच जेवण देण्यात आले.

किरण साठे यांनी घरपोच जेवण ज्यांना हवे आहे,त्यांनी आपला मोबाईल नंबर देऊन फोन करून कळविण्याचे आवाहन केले आहे, तसेच ज्या लोकांना माहीत आहे की,आपल्या आसपासच्या लोकांना या योजनेची गरज आहे, मात्र त्या कुटुंबातील व्यक्तीकडे मोबाईल नाही त्यामुळे तो आम्हाला संपर्क करू शकत नाही तशीही संबंधित व्यक्तीने माहिती देण्याचे आवाहन किरण साठे यांनी केले आहे,त्याचप्रमाणे ही मोफत घरपोच योजना ही दिनांक १५ एप्रिल पर्यंत कोणत्याही परिस्थितीत चालू ठेऊन समाजकार्य करण्याचा मानस किरण साठे यांनी ठेवला आहे, आणि आज दिलेल्या ८९ कुटुंबाना १५ एप्रिल पर्यत रोज जेवण देण्यात येणार आहे.किरण साठे यांच्या या योजने संदर्भात सर्व समाजातून कौतुक होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle